
करमाळा प्रतिनिधी
सोमवारी गणरायाचे आगमन झाले आहे. नगरपालिकेकडून गणेश उत्सवाची आतापर्यंत कोणेतीही पूर्वतयारी झालेली नाही. शहरातील मेनरोड सह सर्वच अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, ते बुजवून घेणे व साफ सफाई करणे आवश्यक आहे. बऱ्याच रस्त्यावर पाईपलाईन दुरुस्ती साठी जेसीबी ने रस्ते उकरलेले आहेत. अगोदरच उन्हाळ्यापासून मागील महिन्यापर्यंत शहरवाशीयांचे पाण्यामूळे खूप हाल झाले आहेत. कधी कधी आठ -आठ दिवस पाणी मिळाले नाही. नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमीतता जाणवत आहे. शहरातील गटारे, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आमची सत्ता असताना सतत साफ ठेवले.

आपण पाण्याबाबत कधीच शहरवासीयांना अडचण येवू दिली नाही. गणेश उत्सव पूर्वतयारी म्हणून आम्ही गणेश उत्सवाच्या अगोदर सर्व त्या उपयायोजना केल्या होत्या. कालपासून वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे. परंतू सत्ताधारी मंडळी अन् नगर पालिका प्रशासन अजून जागे झालेले दिसत नाही. तात्काळ प्रशासनाने पूर्वतयारीच्या उपाययोजना केल्या नाही तर आपण मोठे जनआंदोलन करून प्रशासन व सत्ताधाऱ्यांना जाब विचारू असा इशारा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिला आहे.