करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपालिका प्रशासन अधिकारी गेली आठ वर्ष प्रभारी म्हणून कार्यरत असणारे अनिल बनसोडे यांच्या कार्यकाळात शिक्षण मंडळात मोठा गैर प्रकार झाला आसून खोप मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे. शिक्षक बदली, अंतर जिल्हा बदल्या, कर्तव्यावर असताना काही शिक्षकांना सोबत घेऊन राशिन येथील नामांकित हॉटेल मध्ये दुपारच्या वेळी पार्टी करतात यामुळे शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या घटली. विद्यार्थी भवितव्य अंधारमय झाले आहे. खाजगी शाळेत मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी पालकांचा कल वाढला आहे. एक अधिकारी आठ -आठ वर्ष एकाच ठिकाणी प्रभारी कोणत्या नियमात बसतो असा प्रश्न उपस्थित होतो. दोन-दोन महिने ते कार्यालय मध्ये हजर नसतात. कधीच ऑफिस मध्ये भेटत नाही. आर्थिक देवाणघेवाण असेल तर गुपचूप मुली नंबर एक शाळेत येऊन बसतात व तेथून निघून जातात. ऑफिस मध्ये चौकशी केली असता त्यांचे वडील आजारी आसल्याचे खोटी माहिती क्लार्क कोकाटे सांगत आहे. हा सगळा प्रकार मिळून चालू आहे. त्यांच्या ऑफिस मध्ये सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवून चेक करावे ते कीती दिवसाला येतात चौकशी करावी. तक्रारी नंतर शिक्षण उपसंचालक यांनी चौकशी अधिकारी म्हणून सुलभा वाठारे मॅडम यांची नियुक्ती केली परंतु ज्यांच्या विरोधात चौकशी आहे त्यांच्याच गाडीत बसून येऊन यांनी चौकशी केल्याचे नौटंकी केली आहे. संबधित अधिकारी शहरात राजकारण करत आहे. वाढत्या तक्रारी मुळे आठ वर्षात दोन वेळा झालेली बदली वरिष्ठ पातळीवर आर्थिक देवाणघेवाण करुन रद्द करून घेतल्याची चर्चा देखील चालू आहे. महिती अधिकारी खाली अनेक लोकांनी माहिती मागितली परंतु ती माहिती न मिळाल्या मुळे अपील अधिकारी म्हणून बनसोडे आहेत तो अर्ज स्विकारावा लागेल म्हणून ते ऑफिस कडे फिरकत नाही ते जर ऑफिस मध्ये हजर राहत नसतील तर इथून पुढे अर्ज त्यांच्या खुर्चीवर चिटकू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *