करमाळा प्रतिनिधी

भोंडला (किंवा हादगा) हा महाराष्ट्रातील स्त्रियांचा, विशेषतः कुमारिकांचा एक पारंपरिक लोक उत्सव आहे, जो नवरात्रीच्या काळात आश्विन महिन्यात साजरा केला जातो. या उत्सवात अंगणात पाटावर हत्ती काढून, गोल फेर धरून पारंपरिक गाणी गात आणि नाचत ‘ऐलमा पैलमा गणेश देवा’ या गीताने सुरुवात केली जाते.

त्याच प्रमाणे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहात भोंडला साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी छान आवरून आले होते. सर्वप्रथम हत्तीची मूर्ती सजवून त्या भोवती फेर धरण्यात आले. तसेच भोंडला गीत गायन करण्यात आले होते. या नंतर विद्यार्थ्यांनी गरबा तसेच दांडिया खेळायला सुरुवात केली व कार्यक्रमाचा आनंद लुटला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिकांनी मेहनत घेतली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *