करमाळा प्रतिनिधी

सोलापूर ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत शालेय सोलापूर जिल्हास्तरीय स्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी कुस्ती स्पर्धा सोलापूर येथे व धनुर्विद्या स्पर्धा अरण ता.माढा येथे पार पडल्या. त्यात न्यू इरा पब्लिक स्कूल ची दोन विद्यार्थीनीनी घवघवीत यश संपादित केले. त्या स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थीनी अनुष्का महेंद्र शिंदे हिची 17 वर्षे वयोगट (46 किलो) मधुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून तिची कुस्ती स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड झाली. श्रद्धा उमेश बोराडे इयत्ता 7 वी हिने आपल्या गटात धनुर्विद्या स्पर्धेत जिल्हयात द्वितीय क्रमांक मिळवून तिची धनुर्विद्या स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड झाली.

विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक योगेश शेवाळे व सागर तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक डॉ. ब्रिजेश बारकुंड, विद्या बारकुंड, कसबे सर, हराळे सर, शिंदे सर व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *