करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील संगोबा येथे अतिवृष्टीमुळे ‌सीना नदीला पूर आल्यामुळे येथील शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या वाडी वस्तीवर पाणी आल्यामुळे शेतकरी पुरता अडकले होते अशा शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्याचे काम येथील भोई समाजातील शामराव भोई, भारत भोई, साहेबराव भोई, सचिन भोई, अविनाश भोई, दादा भोई, यांनी स्वतः ची जीवाची पर्वा न प्राणाची बाजी लावून शंभर ते दिडशे लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले आहे.

एकीकडे स्वतःची शेतीचे नुकसान झाले असताना आपला प्रपंच उध्वस्त झाला असतानाही ‌माणुसकीच्या भावनेतून भोई समाजातील या समाज बांधवांनी प्राण वाचवले आहे.

संगोबा, बोरगाव, निलज, बाळेवाडी,‌ तरटगाव या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ‌नवजीवन देण्याचे काम या बांधवांनी केले असल्यामुळे प्रशासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा तसेच करमाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा समितीत यांना घेऊन भावी काळात करमाळा अशा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *