
करमाळा प्रतिनिधी
करमाळा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत योजना अधिकारी शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांचे मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यात पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे वतीने साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी सर्व 208 केंद्रावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये घेण्यात आली. तालुकाप्रमुख जयवंत नलवडे तसेच विस्ताराधिकारी नितीन कदम, मिनीनाथ टकले, प्रभावती जगताप यांनी उत्कृष्टपणे परीक्षेचे नियोजन करून परीक्षा संपन्न पार पाडल्या. तालुक्यासाठी 2139 असाक्षरांचे उद्दिष्ट होते परंतु सर्वेक्षणामध्ये 2714 अस अक्षरांची नोंदणी होऊन 135% कामकाज करमाळा तालुक्याचे झालेले आहे. परीक्षा दिवशी स्त्री 1647 पुरुष 958 एकूण 2605 परीक्षार्थींनी उत्साहात परीक्षा दिली. काही भागात पोळा सण असताना देखील परीक्षार्थींनी उपस्थिती दाखवून परीक्षा दिलेली आहे. सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय शिक्षक, सर्व विशेष शिक्षक यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षार्थींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. जयवंत नलवडे यांनी सर्व उपस्थित परिक्षार्थीचे अभिनंदन केले आहे.

…………..
वांगी १ या शाळेस विस्तार अधिकारी नितीन कदम यांनी भेट देवून असाक्षर परिक्षार्थीचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. परिक्षेला मिळालेला प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले. परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही परंतु शासनाने या वयातही शिक्षण देवून आमची इच्छा पूर्ण केली. आम्हाला शाळा शिकण्यास मिळाली अशी प्रतिक्रियाही काहींनी दिल्या.