
करमाळा प्रतिनिधी
दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये करिअर कट्टा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करमाळा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. राजेंद्र ढोरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल बी पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे व मुकुल माधव संस्थेचे संतोष शेलार हे उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी पी. एस. आय. राजेंद्र ढोरे यांनी मी कसा पी.एस.आय. झालो याचे अनुभव कथन केले व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरित केले. त्याचबरोबर मुकुल माधव संस्थेचे संतोष शेलार यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी सर्व संकटावर मात करून अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळू शकते हे सांगितले. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले व कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी महाविद्यालय व संस्था विद्यार्थ्यांसाठी तयार आहे अशी ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. यावेळी स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रा. उत्तम विटूकडे यांनी आपल्या व्याख्यानातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जावे हे सांगितले.

याप्रसंगी फिनोलेक्स कंपनीचे डीलर शिवाजी सरडे, पाणी फाउंडेशनचे आशिष लाड, कीर्तनकार ह.भ.प. अभंग महाराज व त्यांचे सहकारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना भाग्यवंत व प्रा. रुपाली थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार करिअर कट्टाचे प्रमुख डॉ.अंकुश करपे यांनी मानले.