करमाळा प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा ची टीमकडून करमाळा नगरपरिषद येथे कार्यालयीन अधिक्षक कविटकर व स्वच्छतानिरीक्षक पुजारी यांची भेट घेऊन भटकी व पाळीव कुत्र्यांचा बंदोबस्त व प्रतिबंधात्मक कार्यवाहीची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

भटके व मोकाट कुत्र्यांबाबत- निरबिजीकरण करावे व रेबिज प्रतिबंधक लस द्यावी तसेच पाळीव कुत्र्यांबद्दल महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ च्या २९३ व Animal Birth Control Rule २०२३ नुसार – पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर आणताना पुर्ण खबरदारी घ्यावी, कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा व कुत्र्यांच्या तोंडला जाळी असावी म्हणजे तो नागरिकांना नुकसान पोहचवणार नाही, पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिलेले प्रमाणपत्र नगरपरिषद च्या आरोग्य विभागकडे आणुन जमा करावेत, उल्लंघन करणार्‍यांची तक्रार नागरिकांना करता यावी ह्यासाठी नगरपरिषदने हेल्पलाईन नंबर सुरु करावा.

वरील सुचना नगरपरिषदने नागरिकांपर्यंत योग्य माध्यमातुन व जाहिर फलकांवर प्रसिद्ध कराव्यात.

पाळीव कुत्र्यांबाबत जर कुत्र्यांच्या मालकांनी खबरदारी घेतली नाही व नियम भंग केले तर नगरपरिषद ने अश्या लोकांवर नगरपरिषद अधिनियम १९६५ कलम २९३ नुसार दंडात्मक कारवाही व गुन्हे नोंदवण्याची मागणी देखील अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तर्फे करण्यात आली आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सोलापुर जिल्हा महिला अघाडी प्रमुख माधुरीताई परदेशी, जिल्हा कोषाध्यक्षा ललिता वांगडे, करमाळा तालुक्याचे संघटक अजिम खान, सदस्य निलिमा पुंडे, मंजिरी जोशी व अशपाक सय्यद उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *