
करमाळा प्रतिनिधी
तालुकास्तरीय योगा स्पर्धेत क.आ.ज.विद्यालयातील इयत्ता 7वी विद्यार्थिनी दिव्या भुसारे 14 वर्ष वयोगटात रिदमीक योगा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक 17 वर्ष वयोगटात 9 वी ची विद्यार्थिनी श्रेया अशोक सरडे 10 वी चा विद्यार्थी ललित शिंदे यांची ट्रेडिशनल योगा स्पर्धेत दोघांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिघांची निवड झाली. त्यासाठी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले होते. यावेळी अण्णासाहेब जगताप विद्दालयाचे सचिव गुलाबराव बागल व मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले होते.

