करमाळा प्रतीनिधी
संबंधित वैद्यकीय अधिकारी सातत्याने गैरहजर असतात. शाळेत ये जा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, नवीन शाळा, कॉलेज या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे पालक, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक या सारख्या ठिकाणी प्रवेश मिळवणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येत असतात, परंतू मुख्य वैद्यकीय अधिकारी (ज्यांच्याकडे सहीचा अधिकार आहे) गैरहजर असल्यामुळे असंख्य हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे त्यांना विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयाचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रा.आ. केंद्र येथे येत असतात, पण मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्याच्या पदरी देखील निराशाच येते. मिळालेल्या माहिती नुसार संबंधित वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस येत असतात. तसेच ज्या दिवशी ते येतात त्या दिवशी देखील वेळेवर न येता दहा नंतर येतात व 12 ला निघून जातात. एखाद्या जेष्ठ नागरिकांनी डॉक्टर आपण उशिरा का आलात असे सहज जरी विचारले तरी ते त्याच्याशी हुज्जत घालतात व त्याच्या वरतीच गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात किंबहुना दाखल करतात देखील.
संबधीत वैद्यकीय अधिकारी हे MBBS गट अ संवर्गातील आहेत, परंतू त्यांचे वर्तन रुग्णाशी, रुग्णाच्या नातेवाईकशी व कर्मचाऱ्याशी देखील अत्यंत गैर, उद्धट, मुजोर, अत्यंत अशोभनीय आहे. अंदाजे दीड दोन वर्षांपूर्वी याच प्रा. आ. केंद्रातील कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून ते आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी उपोषणास बसले होते परंतू तरीदेखील या मुजोर वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही. हे फक्त बिनबुडाचे आरोप किंवा खोटी माहिती नसून वैद्यकीय अधिकारी टोपे यांच्या उपस्थिती बाबत उपस्थित केलेल्या बाबी मागील तीन ते चार वर्षातील केस पेपर वरून तसेच एका वर्षातील PHC मधील CCTV फूटेज वरून आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात येईलच तरी संबंधित वैद्यकीय अधिकारी सरासरी सहा ते आठ दिवस (वेळेवर नाही) हजर राहून पूर्ण महिन्याचा पगार घेतात. अश्या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे शासनाची पर्यायानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन होत आहे. तरी या बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नदीप टोपे यांच्या मागील तीन ते चार वर्षातील उपस्थिती बाबत शासनाने आरोग्य मंत्रालयाने सखोल चौकशी करून त्यांनी घरी बसून लाटलेला फुकटचा पगार शासनाने व्याज सहित वसुल करावा व तसेच याची प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर येथून तात्काळ बदली करावी किँवा निलंबन करण्यात यावे, हे न झाल्यास आम्हाला उपोषण व आंदोलन करावे लागेल अशी मागणी भिवरवाडीचे सरपंच डॉ.भाऊसाहेब शेळके यांनी केली आहे.