
करमाळा प्रतिनिधी
कमलाभवानी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे यांच्या शुभहस्ते व रोलर पूजन मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (काका) सरडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कमलाभवानी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे एकमेव अशा स्थान असल्याचे सुजित (तात्या) बागल यांनी म्हटले. सर्व शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटल्यामुळे पुढील भविष्य काळामध्ये कारखान्याला चांगले दिवस येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मा. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी देखील कारखान्याला शुभेच्छा पर भाषण करून कारखान्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ऊसाची उपलब्धता वाढत असल्यामुळे भविष्य काळामध्ये साखर कारखान्याला चांगले दिवस येतील परंतु त्यासाठी कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवायला हवी. माझा कमलाभवानी साखर कारखान्यावर विश्वास असून दादा पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने कारखाना चालवतील अशी आशा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन (भाऊ) उबाळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केली. पुढील वाटचालीसाठी कारखान्याला शुभेच्छा दिल्या.
कमलाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाल्यामुळे पुढील काळामध्ये साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र तयार होऊन कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी आपणास काम करावे लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांची ऊस बिल देण्याचा प्रयत्न करू असे म्हटल्यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी दादा पाटील, महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहास (बापू) निमगिरे, भरत (भाऊ) अवताडे, डॉक्टर गोरख गुळवे, नानासाहेब निळ, विनय ननवरे, तात्या (मामा) सरडे, दशरथ (शेट) घाडगे, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश (भाऊ) चिवटे, संतोष अण्णा जाधव, राजेंद्र बारकुंड, सुजित (तात्या) बागल, रवी वळेकर, शशिकांत सरडे, समाधान भोगे, शहाजी झिंजाडे, निमगाव चे मा. सरपंच रघुदादा शिंदे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग (आबा) घाडगे, राजाराम राजमाने, दत्तात्रय माने, नवनाथ जगदाळे, राष्ट्रवादी वि.युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अश्पाक जमादार, माजी सरपंच बोरगाव श्रीराम भोगल, शेवर्याचे सरपंच लक्ष्मण मस्के,मा. सरपंच देवीचामाळ सिद्धेश्वर सोरटे, दत्तात्रय आढाव, अनिल केकान (शेलगाव वांगी), राजेंद्र बेरे, लक्ष्मण कोंडलकर, दत्तात्रय वाळुंजकर, भारत झिंजाडे, सचिन गायकवाड, बाबासाहेब शिंगटे, शहाजी (आबा) शिंदे, अनिल पवार, लक्ष्मण कोंडलकर, भरत झिंजाडे, उद्धव फुके, जावेद मुलाणी, हरून मुलाणी, महादेव चव्हाण, हनुमंत धनवे, मोहन गोडसे, नागनाथ लबडे, सचिन गायकवाड, बाबासाहेब शिंगटे, अँड. विजय खरसडे, सुग्रीवनाना खडसरे, अनिल शेळके, तात्यासाहेब जाधव पाटील, गणेश सरडे, श्याम गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष राजेंद्र पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर अरविंद चौधरी, डेप्युटी जनरल मॅनेजर क्षीरसागर, मुख्य शेती अधिकारी जगदाळे, शेती अधिकारी पाटील,चीप इंजिनियर गायकवाड, चीप केमिस्ट जाधव, चीप फायनान्स ऑफिसर उबाळे, प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप, ऊस पुरवठादार अधिकारी सुजय शिंदे परचेस ऑफिसर सय्यद, सिविल इंजिनियर टोणपे, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.