
करमाळा प्रतिनिधी
वीर शिवाजी महाराज शिवकालीन युद्ध कला ग्रुप करमाळा यांना स्वराज्याच्या मावळ्यांच्या वंशज्यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट शिवकालीन युद्ध कला ग्रुप पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे आयोजन छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या वतीने अथर्व मंगल कार्यालय करमाळा या ठिकाणी करण्यात आले होते. हा पुरस्कार देण्यासाठी स्वराज्याचे मावळे त्यांचे वंशज नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालदादा मालुसरे, जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवराजे, हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्रदादा मोहिते, नागपूर गादीचे वंशज सचिनराजे राजेभोसले यांच्या हस्ते आपल्या वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन युद्धकाला जतन करून गोरगरीब तळागाळातील विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या कार्याची दखल घेऊन उत्कृष्ट शिवकालीन युद्ध कला ग्रुप म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांचे नागनाथ बोळगे सर प्रशिक्षक वीर शिवाजी महाराज शिवकालीन युद्ध कला ग्रुपच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
