करमाळा प्रतिनिधी

श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. 

मंदीर जतन संवर्धन कामास शुक्रवार दिनांक १५/०८/२०२५ रोजी ॲड. दिलीप मंगलसिंग डांगे. रा. रोशेवाडी सध्या मुंबई यांच्याकडून ऑनलाईन देणगी रु. ५००१/- (पाच हजार एक रुपये फक्त) प्राप्त झाली आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीकडून अशोक गाठे व्यवस्थापक, प्रशांत गाठे, रघु खटके, लक्ष्मण हवलदार यांनी केला आहे.

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो.नं. ९४०४७०८९२४, ९५७९९६१७७४

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *