करमाळा प्रतिनिधी                  

न्यू इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे 79 वा स्वातंत्र्यदिन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार विश्वंभर दगडू लांडगे (भारतीय भूदल) व त्यांच्या पत्नी उज्वलाताई विश्वंभर लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, संस्थेच्या प्रकल्प संचालिका विद्याताई ब्रिजेश बारकुंड, पालक-शिक्षक संघाचे सदस्य शहाजी शिंदे, जयवर्धन सरडे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. स्वागतगीत, ध्वजगीत, भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्राव्या तुकाराम वायसे या पहिली च्या विद्यार्थीनीने देशभक्तीपर गीत सादर केले. इयत्ता आठवी च्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य व मानवी मनोरे सादर केले. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी सुद्धा देशभक्तीपर गीत सादर केले. ATS,ITS, बुद्धिवंत व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थांना ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच वार्षिक परीक्षा 24-25 मधील गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्रे व बक्षिस प्रदान करण्यात आले. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत चमकेल्या संध्याराणी लबडे हिचा गौरव करण्यात आला. वर्षभर एकही सुट्टी न घेतलेल्या शिक्षिका पाटकूलकर मॅडम यांना सलग तिसऱ्या वर्षी पारितोषिक  देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण वर्गाचे 30 पर्यंत पाढे पाठ करून घेणाऱ्या कोठारी मॅडम (इयत्ता 5 वी अ) व कसबे सर (इयत्ता 9 वी) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बारकुंड,  मुख्याध्यापक कसबे सर, उपमुख्याधपक हराळे सर, जुनियर कॉलेज विभाग प्रमुख शिंदे सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ड्रायव्हर बंधू यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हराळे सर, ननवरे मॅडम, जाधव मॅडम, रोकडे मॅडम, फकीर मॅडम, अन्नपूर्णा मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन खाडे सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *