करमाळा प्रतिनिधी
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांची भेट श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसह भेट घेतली होती. यावेळी कर्मचारी यांनी पवार यांना त्यांचे थकलेले पेमेंट व इतर समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी साखर आयुक्त यांना ताबडतोब फोन पवार यांनी लावला व सोमवारी याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू असे आयुक्त यांनी सांगितले होते. यावेळी कर्मचारी बापूसाहेब मच्छिंद्र गीरंजे, आजिनाथ काशिनाथ निकत, अनंता संभाजी मोहिते, गणेश शंकर गाडे, कैलास दादासाहेब धांडे, निलेश हरिश्चंद्र पवार, मालोजीराव भिकाजीराव जाधव, महेंद्र साहेबराव देशमुख आदिजण उपस्थित होते.
…..
यासंदर्भात मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही व परत केलाही नाही.