करमाळा प्रतिनिधी

पवित्र श्रावण मासानिम्मित करमाळा शहरातील किल्ला वेस येथील राजेरावरंभा काळातील खोलेश्वर महादेवाची रथ यात्रा मिरवणूक श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी करमाळा शहराच्या प्रमुख मार्गावरून जात असुन करमाळा शहरातील जागृत देवस्थान म्हणून पेशवे कालीन असलेल्या महादेव खोलेश्वर रथाची मिरवणूक दरवर्षी सालाबादप्रमाणे तिसऱ्या

सोमवारी निघत असून खोलेश्वर महादेव रथाच्या मिरवणुकीची पूजा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ अवताडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, युवा नेते अमोलसिंह परदेशी, खोलेश्वर महादेव मंदिराचे पुजारी नागेश गुरव, रथाचे मानकरी गणेश झोळे, रथ ओढण्याचे मानकरी सुखदेव लष्कर, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, नगरसेविका संगीताताई खाटेर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील व खोलेश्वर मंडळाची सर्व सदस्य व महादेव भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. करमाळा शहरातील जागृत देवस्थान म्हणून पेशवे कालीन असलेल्या महादेव खोलेश्वर रथाची मिरवणूक दरवर्षी सालाबादप्रमाणे तिसऱ्या सोमवारी निघण्याची पंरपरा कायम चालू आहे. खोलेश्वर मंडळाची सर्व सदस्य व महादेव भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सदर महादेव खोलेश्वर रथाची मिरवणूक महादेव मंदिर किल्ला वेस येथून निघणार असून मिरवणुकीचा मार्ग किल्ला वेस, फुलसौंदर चौक, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त पेठ, सुभाष चौक, राशीन पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ते किल्ला वेस महादेव मंदिर किल्ला वेस या मार्गे असते करमाळा शहर तालुक्यातील भक्त मंडळी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होतात.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *