करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये दिनांक 11/8/2025 रोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजयराव बिले यांचा साठावा वाढदिवस व्याख्यानाच्या कार्यक्रमाने विजयश्री सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी पुणे येथील निलया अकॅडमीचे प्रा. केतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधत आपल्या व्याख्यानातून वाणिज्य शाखा उत्तीर्ण झाल्यानंतर कशाप्रकारे करिअर करावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एल. बी. पाटील सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. विजयराव बिले यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारास उत्तर देताना डॉ. विजयराव बिले म्हणाले की, या महाविद्यालयात शिकत असताना लगेच मला याच महाविद्यालयात शिकवण्याची संधी मिळाली आणि माझे करिअर झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर कडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंकुश करपे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे व कॅ. संभाजी किर्दाक व महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *