
करमाळा प्रतिनिधी
श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे.
श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन व संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
मंदीर जतन संवर्धन कामास आज नारळी पौर्णिमा निमित्त शनिवार दिनांक ०९.०८.२०२५ रोजी प्रांजल अक्षय स्वाती अनिल श्रीश्रीमाळ रा. कोल्हापूर यांचे कडून रोख देणगी रु. ११,००१/- (आकरा हजार एक रुपये फक्त) प्राप्त झाली आहे. या निमित्त श्रीकमला देवी मंदिर समिती कडून मंदीर पुजारी रोहित पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे, अशोक गाठे व्यवस्थापक, हनुमंत पवार, पद्माकर सूर्यपुजारी यांनी सत्कार केला. यावेळी श्रीश्रीमाळ, कोल्हापूर व बलदोटा परिवार करमाळा उपस्थित होते.

श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो. नं. ९४०४७०८९२४, ९५७९९६१७७४