करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर ग्रामीण चा जिल्हा पदाधिकारी संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.सुनिलजी तटकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये संघटनात्मक बळकटीकरण जनसंपर्क वाढवणे व विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा सर्वसमावेशक विचार आहे, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आजपर्यंत राष्ट्रवादीने केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, करमाळयाचे मा. आ.संजयमामा शिंदे, पंढरपुर तालुक्याचे नेते कल्याणराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष  कल्याणराव आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आनंदजी परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापुर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी लतीफ भाई तांबोळी,  रामेश्वर मासाळ,  दादा कोरे,  शिवानंद पाटील, वर्षा शिंदे, युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, करमाळा तालुका अध्यक्ष भरत आवताडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सदस्य अजिंक्य पाटील, उपाध्यक्ष अश्पाक जमादार, दिपालीताई पांढरे यांसह जिल्हयातील विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……………………..

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व मी स्वतः मा. आ. संजयमामा शिंदे यांना सांगितले होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहावे तुम्ही उभा राहिले नाही, चिन्हावर उभा राहिले असते तर निवडणुकीत विजयी झाले असते : खा. सुनील तटकरे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *