करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र अॅड. गोवा नोटरीज असोसिएशनच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी नोटरी अॅड. विजय तळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना दिलेल्या निवडीच्या पत्रावर असोशियशनचे अध्यक्ष अॅड. सिकंदर अली सय्यद, कार्याध्यक्ष

अॅड. यशवंत खराडे, सचिव अॅड. प्रवीण नलवडे, प्रवक्ता अॅड. आशिष लांडगे, महिलाध्यक्षा अॅड. शोभा काड, कोषाध्यक्ष अॅड. कादरी यांच्या सह्या आहेत. त्यांची ही निवड असोसिएशनच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अॅड.सय्यद सिकंदर अली, यशवंत खराडे प्रविण नलवडे, उपाध्यक्ष अॅड. नितेश ललवाणी यांनी

अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल अॅड. विजय तळेकर यांनी महाराष्ट्र अॅण्ड गोवा नोटरी असोसिएशनचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून नोटरी वकिलांच्या विविध समस्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे निवडीनंतर सांगितले. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *