
करमाळा प्रतिनिधी
विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. राज्यामध्ये जो चौफेर विकास दिसत आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे असे मत भाजपा नेते सूर्यकांत पाटील यांनी व्यक्त केले.

ते श्री जगदंबा मूकबधिर निवासी शाळा श्रीदेवीचामाळ करमाळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस सोशल मीडिया प्रमुख गणेश मोहन कराड यांच्या संकल्पनेतून खाऊवाटप व गोवंशानां चारा वाटप कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
नगरसेवक ते महापौर ते सहा वेळा आमदार दोन वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास परिवाराच्या संस्कारात वाढल्यामुळेच शांत संयमी आणि विकासाला चालना कोणी दिली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनीच दिली.

लोककल्याणकारी योजना केंद्र व राज्य यांचा समन्वय घडवून शेतकऱ्यांना विविध योजना, उद्योग क्षेत्रात नवक्रांती प्रशासनामध्ये पारदर्शकता, सुसूत्रता, बेरोजगारासाठी नवनवीन नोकऱ्यांची संधी नवनवीन महामार्ग अशा विकासाच्या चालना देणाऱ्या कार्यामुळेच महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये अग्रेसर ठरत आहे आगामी काळामध्ये स्वयंपूर्ण खेडी तसेच महानगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही विरोधकाकडून कितीही टीका झाल्या तरी ही आपल्या प्रामाणिक कार्याचा ठसा त्यांनी सोडला नाही.

तसेच कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस, असं खंबीर नेतृत्व भाजपला मिळालेले आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, स्नेहालय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, अध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांची ही भाषणे झाली.
यावेळी संस्थेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. संस्थेच्या वतीने स्वागत सातपुते सर यांनी केले. यावेळी अण्णासाहेब सुपनवर, मनोज कुलकर्णी, दादासाहेब पाठक, युवा सेनेचे दादासाहेब तनपुरे आदी जण उपस्थित होते.
तसेच पांजरपोळ गोरक्षण संस्थे मध्ये चारा वाटप करण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण, भाजपा नेते सूर्यकांत पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, भाजपा शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, भाजपा ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, माजी नगरसेवक किरण बोकन, दिनेश मडके, पांजरपळ गोरक्षण संस्थेचे भरतशेठ गांधी, जाकीर पठाण, विपुल गांधी, अब्रार पठाण आदी जण उपस्थित होते.