
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ग्रीन डे तसेच रेनी डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा याचा संदेश देत स्कूलच्या आवारात झाडे लावली. विविध झाडांचे रोपे लावून ग्रीन डे मान्सूनचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. ग्रीन डे निमित्त विविध पानांचा तसेच हिरव्या फळांचा पेहराव

विद्यार्थ्यांनी केला होता. ग्रीन डे तसेच रेनी डे च्या निमित्ताने छत्री, हिरवा बाँल,बँट,बास्केट, ड्रेस,पाल्या भाज्या आदि ग्रीन कलरचे साहित्य विद्यार्थ्यांनी आणले होते. तसेच रंगीबेरंगी छत्र्या रेनकोट घालून छोटे विद्यार्थी सहभागी झाले होते.उत्साहात

ग्रीन डे व रेनी डे साजरा करण्यात आला होता. शाळेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यक्रम शिक्षक कर्मचारी यांनी घेतला होता.
या वेळी मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.
