
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी पै. प्रकाश उर्फ पप्पू आप्पा चोरमले यांची निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. करमाळा तालुका भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती भाजप सोलापूर चिटणीस विनोद महानवर, भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, सतीश नरुटे, माऊली सलगर, अंकुश

लांडगे, राहुल चोरमले, पै. आबा कोंडलकर, शिवाजी राऊत, आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी प्रकाश चोरमले म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवणार राष्ट्रवादी युवक काँग्रेसची गाव तिथे शाखा काढणार संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दौरा काढून युवकांची फळी तयार करणार सर्वांना सोबत घेऊन पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार. यावेळी आभार सतीश नरुटे सर यांनी व्यक्त केले.
