
करमाळा प्रतिनिधी
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खालच्या शब्दांमध्ये व अपमानास्पद बोलल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करमाळा शहरामध्ये तुळशी वृंदावन या ठिकाणी शुक्रवार 18 रोजी ठीक बारा वाजता होणार आहे. या आंदोलनाचे निवेदन करमाळा तहसीलदार व करमाळा पोलीस स्टेशनला सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आले.

तहसीलचे अधिकारी बांदल यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर भाजप जिल्हा चिटणीस विनोद महानवर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, राहुल चोरमले, प्रदीप वाघमोडे, माऊली सलगर, राम शिंदे, सतीश नरुटे, अंकुश लांडगे, किशोर शिंदे, आदी पदाधिकारी

उपस्थित होते. यावेळी डॉ. नरेंद्र ठाकूर म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर हे आमचे दैवत असून त्यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले अपमानास्पद बोलल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचा उद्रेक झालेला आहे त्यांचा निषेध म्हणून करमाळा शहरांमध्ये उग्र स्वरूपाचे जोडो मारो आंदोलन केले जाणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर कोणी आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका केली तर जशास तसे उत्तर आम्ही पण देऊ. उद्याच्या जोडो मारो आंदोलनाला आमदार गोपीचंद पडळकर प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.
