करमाळा आमसभेतील प्रश्नाची मिळणार लेखी उत्तरे मनसेच्या मागणीला यश गटविकास आधिकार्यांनी काढले लेखी उत्तरे देण्याचे आदेश – संजय घोलप
करमाळा
करमाळा तालुक्याचे आमसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष मा.संजय घोलप यांच्या मागणीनुसार तब्बल 12 वर्षातून घेण्यात आली
आमसभा दि .30 /5/ 2025 शुक्रवार या रोजी पार पडली अनेक नागरीकांनी त्या साठी एक महिना अगोदर करमाळा गटविकास अधिकारी आमसभा सचिव यांच्या आदेशानुसार तालुक्यातील नागरींकांनी आपले प्रश्न लेखी अर्ज करून व ऑनलाईन पध्दतीने पंचायत समितीत पाठवले

परंतु आमसभेसाठी 200 च्या वरती प्रश्नांचा भडीमार नागरींनी लेखी व ऑनलाईन पाठवले तरी सुध्दा त्यांच्या प्रश्नांना तेथे उपस्थित केले गेले नाही मा.संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांनी वर्तमान पत्रातुन केली होती लेखी प्रश्नाची उत्तरे मिळावीत म्हणुन मागणी ,
आमसेभेत दिवशी सुरवातीपासून आधिकारी आढावा सत्कार समारंभ असे कार्यक्रम घेण्यात आले त्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नांची आपली समस्या उपस्थित करण्यास संधी वेळे आभावी मिळाली नाही 75 % नागरींकांचा भ्रम निरास झाला व ते एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहुन पण आपल्याला न्याय मिळाला नाही हिच खंत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मा.संजय घोलप यांच्या कडे बोलुन दाखवली त्यानंतर मा.घोलप यांनी त्यांची दखल घेत
करमाळा गटविकास आधिकारी यांना वर्तमानपत्रातून सर्व आमसभेतील आलेल्या प्रश्नांना लेखी उत्तरे द्यावीत अशी मागणी केली होती

त्यामुळेच आज गटविकास आधिकरी यांनी आमसभा सचिव म्हणुन सर्व शासकीय ऑफिस अधिकारांना त्यांची लेखी उत्तरे आठ दिवसाच्या आत द्यावीत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष मा.संजय घोलप यांच्या बातमीचा संदर्भ देऊन आदेश काढले आहे
तरी तालुक्यातील नागरिकांनी घोलप यांना भेटुन फोनद्वारे समाधान व्यक्त करून आभार मानले ..
जरं समाधान कारक उत्तरे नाही मिळाली तरी आपण सर्व मिळून तालुक्यातील नागरींकांच्या हितासाठी सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करू असे नागरीकांना घोलप म्हणाले
तालुक्यातील प्रत्येक मनसे पदाधिकाऱ्यांरी व मनसैनिक कायम आपल्या सेवेत सदैव राहील .
