करमाळा प्रतिनिधी

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री व पालकमंत्री सोलापूर जयकुमार भाऊ गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त ९ जुलै व १० जुलै २०२५ महा-जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संत रघुराज महाराज यांचे ९ वे वंशज ह.भ.प. रामभाऊ महाराज निंबाळकर व संत रघुराज महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. अनिरुद्ध महाराज निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी केले होते.

महा-जन आरोग्य शिबीरामध्ये 400 ग्रामस्थांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. 300 ग्रामस्थांची मोफत डोळे तपासणी व मोफत डोळ्याचे ऑपरेशन या मधील 25 पेशंट ऑपरेशनचे निघाले आहेत व 107 ग्रामस्थांनी रक्तदान शिबीर केले.

यावेळी समस्त गावकरी व पाहुणे मंडळी व मित्रपरिवार उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *