
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील नृत्यशैली भरतनाट्यम् नृत्यालयात शास्त्रीय नृत्यप्रकार शिकवला जातो. अनेक मुली आणि महिलाही भरतनाट्यम् हा शास्त्रीय नृत्यप्रकार शिकण्यासाठी येत आहेत. ही कौतुकाची बाब आहे. असे मत शिक्षिका सविता शिरसकर यांनी मांडले. नृत्यालयातील विद्यार्थ्यांनींनी गुरुवंदना सादर केली. डॉ. प्रीती शेटे, डॉ. माधुरी राऊत व डॉ. राहुल राऊत, अमोल

बागडे व अश्विनी बागडे, साहित्यिका अंजली राठोड श्रीवास्तव इ.मान्यवरांची सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली. “कुठलेही ज्ञान गुरु शिवाय आपण घेऊ शकत नाही आणि शास्त्रीय नृत्यप्रकार हा गुरु शिवाय पूर्णत्वास येत नाही”, असे मत भरतनाट्यम् नृत्यालयाच्या संचालिका मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी मांडले. शेवटी नृत्यालयाच्या संचालिका मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी आभार मानले. संस्कृत श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.

