करमाळा प्रतिनिधी

जि. प. शाळा वीट येथील बालदिंडी गावातून निघाली प्रत्येक चौकात रिंगण घेऊन टिपरी लेझीम भारुड याचा कार्यक्रम झाला. शेवटी शाळेच्या आवारात गोल रिंगण होऊन आरती झाली. शेवटी बाल वारकऱ्यांना माजी जि. प. वित्त अधिकारी गौतम जगदाळे व आज्ञात व्यक्तीने बाल वारकऱ्यांना जेवण दिले. या दिंडीत सोहळा पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जनार्धन घाडगे, अर्जुन ढेरे, चंद्रहास चोरमले, हनुमंत जाधव, स्वाती डमरे, मंगल कोल्हे, अश्विनी जाधव, सुजाता अनारसे यांनी परिश्रम घेतले. त्यांना गावातील भजनीमंडळ व अंगणवाडी सेविका यांनी मदत केली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट शाळेने आषाढी वारीच्या निमित्ताने जोरदार तयारी केली होती. शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग टिपरी लेझीम नृत्य वेगवेगळ्या चौकात चौकात गावातून विठ्ठल रुक्माई चे आदराने पूजा ओवाळणी व दिंडीचे स्वागत व दिंडी सोहळा अगदी वीटचे ग्रामदैवत रेवन्नाथ मंदिर त्या मंदिरातून भैरवनाथ मंदिराकडे येऊन मैदानावर गोल रिंगण करून या कार्यक्रमाची सांगता अतिशय उत्साहाने व विठ्ठलाची महारती घेऊन करण्यात आली. या कार्यक्रमासाठी गावातील पालक वर्ग व महिला भगिनींनी उत्साहाने भाग घेऊन या कार्यक्रमाचे शोभा वाढवली व सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे कर्तव्यदक्ष शिक्षक अर्जुन ढेरे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *