करमाळा प्रतिनिधी

मौजे वांगी नं. २ ते दहिगाव जुना गावठाण रस्ता आहे. तो रस्ता १५ ते २० मीटर रुंदीचा रस्ता असून हा रस्ता रहदारीचा आहे. शेतकरी, शाळेतील मुले अशा अनेक जनांना या रस्त्याचा वापर करावा लागतो. परंतु काही वर्षापासून या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे. हा रस्ता ३ मीटरचा सुध्दा राहिलेला नाही. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वांगी नंबर दोन चे गावकरी जेष्ठ नागरिक शाळेतील मुले या सर्वांनाच याचा त्रास होत असून या रस्त्याच्या कामामध्ये या अतिक्रमणाची अडचण होत

असल्याने त्याची दात दुजे व दुरुस्ती करता येत नाही धन दांडग्यांनी रस्त्यावर बांधकाम करून शेतामध्ये रस्त्यावर ताली टाकून अगदी तीन मीटरचा सुद्धा रस्ता ठेवलेला नाही आणि या अशा अतिक्रमणास कोणाचा वरदहस्त आहे सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन, संबंधित पोलीस अधिकारी या अतिक्रमणास का पाठीशी घालत आहेत ? त्यांच्या

या अशा समाजविघातक वागण्यामुळे समाजाला याचा त्रास होत आहे हे अतिक्रमण करणारे शेतकरी धन दांडगे व अधिकाऱ्यांच्या का लक्षात येत नाही ? यासाठी आता जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाली असून हे अतिक्रमण तातडीने काढून संबंधित शेतकऱ्यांना व अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना सक्त ताकीद द्यावी अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष गणेश भानवसे यांनी तहसीलदार करमाळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.

या रस्त्यावरचे अतिक्रमण काढून तात्काळ हा रस्ता पूर्ववत करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अन्यथा करमाळा तहसील समोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.

जनशक्ती शेतकरी संघटनेच्या या मागणीला दहिगाव वांगी नंबर 2 व करमाळा तालुक्यातील नागरिकांमधून मोठा पाठिंबा मिळत असून संबंधित अधिकाऱ्यांनी व शासनाने या रस्त्यावरच्या अतिक्रमण काढून रस्ता रहदारीसाठी पूर्ववत खुला न केल्यास करमाळा तालुक्यात जनमुद्रेकाचा सामना प्रशासनाला करावा लागेल याचा विचार करून प्रशासन काय हालचाल करते याकडे करमाळा तालुकावाशीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *