
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर व तालुक्यातील सर्व सकल मुस्लिम बांधवांना विनंती आहे की, दाखल्यावर कुणबी लावावे असे निवेदन मराठा सेवा संघ करमाळा च्या वतीने गट शिक्षण अधिकारी करमाळा व प्रशासन अधिकारी नगरपालिका यांना निवेदने देण्यात आले आहेत यालाच अनुसरून सकल मुस्लिम समाज च्या वतीने सर्व बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या मुस्लिम

बांधवांचे सुद्धा कुणबीचे दाखले व कुणबी च्या नोंदी आहेत. कृपया ज्या विद्यार्थ्यांचे कुणबीचे दाखले आहेत व ज्या पालकांचे दाखले आहेत अशा पालकांनी तात्काळ मराठा सेवा संघाने केलेल्या आव्हानाला साथ देत आपण आपल्या पाल्याचा कुणबी असा उल्लेख दाखल्यावरती करून घ्यावा अशी विनंती सकल मुस्लिम समाज व डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात येत आहेत. कुणबी च्या नोंदी जर दाखल्यावर लागल्या तर त्या विद्यार्थ्याचे पिढ्यानपिढ्याचा फायदा होणार

आहे. शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला सवलती मिळणार आहेत. यामुळे सर्वांनी जागरूक होऊन याचा फायदा घ्यावा ही कळकळीची आणि नम्र विनंती आहे. यावेळी सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर भाई सय्यद, जमियत उलेमा ए हिंद तालुका अध्यक्ष मौलाना मोहसिन, मुफ्ती अबूरेहान, संस्थापक समीर शेख, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, हाजी कलीम काझी सर, उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरैशी, ओ बी सी ऑर्गनायझेशन ता.अध्यक्ष नईम काझी, अॅड. अलिम पठाण,

रा.कॉ. युवक शहराध्यक्ष सोहेल पठाण, अल्पसंख्यक रा.कॉ. पार्टी ता. अध्यक्ष मुन्ना भाई शेख (कोर्टी), मिनाज जागीरदार (कंदर), एडवोकेट असीम जागीरदार (कंदर), रफिक खान (आवटी), आदम शेख़ (वाशिंबे), रमीज शेख (जेऊर), आशपाक भाई (कंदर), इक्बाल शेख, सुरज शेख, रमजान बेग, इमत्याज पठाण, मुस्तकिम पठाण, अलीम पठाण, जाहगीर बेग, कलंदर शेख, फिरोज बेग, कलीम शेख, जावेद सय्यद, अरबाज बेग, शाहिद बेग, कय्युम सय्यद, अलीम शेख, अरबाज पठाण, आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
