करमाळा प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच विक्रमी असा १ कोटी ११ लाख रुपये वाढावा झाला असून बाजार समितीने कोणत्याही वित्तीय संस्थेचे अथवा बँकेचे कर्ज न घेता स्वनिधीतून रस्ते काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली असून पहिल्या टप्प्यातील पूर्व यार्ड मधील रस्ते काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती तथा करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना माजी आमदार जगताप

यांनी सांगितले की, करमाळा बाजार समितीला सन २०२४-२५ मध्ये २ कोटी साठ ६० रुपये उत्पन्न होऊन बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच खर्च वजा जाता विक्रमी असा तब्बल १ कोटी ११ लाख रुपये वाढावा म्हणजेच नफा झालेला आहे. काटकसरीने व अत्यंत पारदर्शक  कारभार केल्यामुळेच अडीच कोटी उत्पन्नात जवळपास सव्वा कोटी रुपये वाढावा होणारी करमाळा मार्केट कमिटी राज्यात एकमेव असल्याचा दावा देखील यावेळी जगताप यांनी केला. पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, हमाल-तोलार व कर्मचारी या सर्वांच्या समन्वयातून करमाळा मार्केट कमिटीचा एक विश्वसनीय बाजारपेठ म्हणून

नावलौकिक असल्यामुळे फक्त तालुक्यातीलच नव्हे तर आसपासचे जिल्ह्यातील देखील भुसार माल मोठ्या प्रमाणात करमाळा मार्केट यार्ड मध्ये विक्रीस येतो. शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव व त्वरीत पट्टी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा करमाळा बाजारपेठेवर पूर्ण विश्वास आहे. या सर्व घटकांच्या विश्वासाच्या बळावरच मी १९८९ साली बाजार समितीची सूत्रे हाती घेतले पासून  बाजार समिती मधे शॉपिंग सेंटर, गोदामे, सेल हॉल, भाजी मंडई, कॅटल मार्केट, रयत भवन,धान्य चाळणी

यंत्र उभारणी सह रस्ते, वीज, पाणी या सर्व पायाभूत सुविधा देण्यात यशस्वी झालो असल्याचे देखील जगताप यांनी आवर्जून सांगितले. भविष्यात करमाळा येथे उर्वरित भागातील रस्ते कॉंक्रिटीकरणासह जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करणे यासह जेऊर उपबाजार आवार येथे नवीन विकास आराखडा तयार करून करमाळ्याच्या धर्तीवर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने जेऊर येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे माजी आमदार जगताप यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *