करमळा प्रतिनिधी  

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न सद्गुरू कृषि महाविद्यालय, मिरजगाव येथील चर्तुथ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

कृषिदूत अभिषेक भुजबळ, अजय डोके, अनिकेत पठारे, रवींद्र धराडे यांचा समावेश असून ते शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचीमाहिती देणार आहेत.

पंगरे गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,त्यांचे ग्रामीण जीवनमान,सामाजिक व आर्थिक स्तर,नैसर्गिक साधन संपत्ती समाजातील सामाजिक स्थिती पीक पद्धती इ.विविध गोष्टीचा अभ्यास करणार आहेत.

याबरोबरच शेतकऱ्यांनाही विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. माती व पाणी परीक्षण,विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, जिवाणू खतांचा शेतीमध्ये वापर,गांडुळखत निर्मिती, पिकांवर येणारे रोग व किडी याची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक अशा विविध विषयांवर शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक डॉ.शंकरराव नेवसे, अध्यक्ष कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामदास बीटे, कार्यक्रम समन्वयक प्रा.चांगदेव माने, कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन आढाव व इतर विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

पांगरे गावचे सरपंच विजया दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच महेश शिवाजी टेकाळे, सदस्य भैरवनाथ दत्तु हराळे,गणेश भैरवनाथ वडणे, सचिन अरुण पिसाळ व सदस्या राणी विवेक पाटील, मयुरा सचिन पिसाळ, मनिषा धनंजय गायकवाड, संध्या महादेव मुरुमकर, गणेश तुकाराम गुटाळ, मच्छिंद्र रामदास उघडे, विष्णू तानाजी जाधव, महादेव गणपत गव्हाणे, रामचंद्र यशवंत शिंदे आदी ग्रामस्थांनी कृषीदूतांचे पांगरे गावात स्वागत केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *