करमाळा प्रतिनिधी

महाराजस्व अभियान शिबिर शासन आपल्या दारी चिखलठाण येथे राबविण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच धनश्री विकास गलांडे यांनी दिली आहे.

आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलठाण ते गुलाबराव सरडे रस्ताचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 27 रोजी सकाळी 10 वाजता भूमिपूजन होईल.

नवीन शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिका दुरुस्ती, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, गॅस योजना, आधार कार्ड नोंदणी, एसटी पास, घरकुल योजना, सर्व प्रकारचे दाखले, सर्व कृषी योजना ही कामे महाराजस्व अभियानांतर्गत होणार आहेत. अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक तथा चिखलठाण वि.का.से. सोसायटीचे चेअरमन विकास बापू गलांडे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *