
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या करमाळा ग्रामीण मंडल मधील संघटनात्मक निवडी विविध मोर्चे सेल इत्यादींच्या करिता इच्छुकांच्या मुलाखती दिनांक 17 जून 2025 रोजी सकाळी दहा वाजता भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांचे मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली असून इच्छुकांनी रश्मी दिदी बागल भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालयात सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा ग्रामीण भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन पिसाळ यांनी आज येथे केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना सचिन पिसाळ म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या ग्रामीण मंडल मधील विविध मोर्चे सेल इत्यादी संघटनात्मक निवडी करता

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सकाळी दहा वाजलेपासून भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मीदिदी बागल यांचे मार्गदर्शना खाली व नेतृत्वाखाली असून या सर्व मुलाखती सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होतील व त्यानंतर यथोचित व योग्य उमेदवारांच्या निवडी जाहीर होतील. यावेळी इच्छुकांनी उपस्थित रहावे. करमाळा तालुक्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची करमाळा तालुक्यात वेगवान घोडदौड सुरू आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडीमध्ये विविध पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शेवटी पिसाळ यांनी यावेळी केले.
