
करमाळा प्रतिनिधी
बिटरगांव (वां) ता.करमाळा येथे 9/07/2025 ते 10/07/2025 या दिवशी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त महा जन आरोग्य शिबीर आयोजित करावे याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी पत्र दिले.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हे शिबीर घेऊ असे सांगितले आहे.

पत्रात असे लिहिले आहे की, बिटरगांव (वां) ता.करमाळा येथे रघुराज महाराज मंदिर असून सुमारे 350 वर्षे पासून परंपरेने दर वर्षी आषाढी एकादशी झाल्यानंतर येणाऱ्या गुरु पौर्णिमेला गुरु पौर्णिमा उत्सव (गोपाळकाला) संपन्न होतों. यावेळी करमाळा, माढा, इंदापूर, परांडा, इ तालुक्यातून हजारो भक्तजन या सोहळ्याला सहभागी होतात. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जयकुमार भाऊ गोरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर महा-जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे.
