
करमाळा प्रतिनिधी
माहिती आधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या उप संघटक करमाळा तालुका पदी देवीदास आप्पा साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोंढार चिंचोलीचे मा. सरपंच व सामजिक कार्यकर्ते देवीदास साळुंके हे गेली 5 वर्षापासुन माहिती आधिकाराचे काम करीत आसुन त्यांनी माहिती आधिकारात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच त्यानी केलेल्या कार्याची दखल घेऊन करमाळा तालुका माहिती आधिकार अध्यक्ष विशाल परदेशी यांच्या शिफारशी नुसार माहिती आधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राज्य अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केली असल्याचे पत्र दी. 7/6/2025 रोजी दिल्याचे साळुंके यानी सांगितले.
