करमाळा प्रतिनिधी

जिद्द चिकाटी प्रामाणिकता याच्या जोरावर ‌कुठल्याही क्षेत्रात यश निश्चित असुन ‌फौजी हॉटेलच्या माध्यमातून मुकुंद साळुंखे सरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत करमाळा पोलीस निरीक्षक ‌रणजीत माने यांनी ‌व्यक्त केले. करमाळा बायपास रोड चांदगुडे पेट्रोल पंपाजवळ फौजी हॉटेलच्या वतीने सदिच्छा भेट आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा समन्वयक उद्योजक निखिल चांदगुडे, करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक

संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके,उत्तम हानपुडे सर, संजय सोनवणे सर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश दळवी, गणेश माने, बाळासाहेब पंडित उपस्थित होते. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उत्तम हानपुडे सर, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र महा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार दिनेश‌ मडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक ‌रणजीत माने म्हणाले की, सध्याच्या युगामध्ये युवा पिढीने नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करून ‌आपले जीवन सुखी समृद्ध करावे. फौजी हॉटेलच्या माध्यमातून मुकुंद साळुंखे सरांनी ‌शिक्षकी पेशातुन स्वेच्छा निवृत्तीनंतरही उद्योग व्यवसायामध्ये‌ ग्राहकाचा विश्वास संपादन करून यश संपादन केले आहे.

कुठल्याही क्षेत्रात उद्योग व्यवसायामध्ये आपण जर प्रामाणिकपणे काम केले तर यश निश्चित आहे. जीवनामध्ये संघर्ष जरी असला तरी सातत्याने प्रयत्न केल्यास माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो यासाठी श्रद्धा आणि सबुरीची गरज असल्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *