करमाळा प्रतिनिधी

16 तारखेपासून शाळा चालू होत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बिटरगांव (वां) येथे एसटी सेवा चालू करावी असे पत्र भाजपा युवा मोर्चा जिल्हापाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी करमाळा आगारप्रमुख यांना दिले.

निवेदन देते वेळी भारतात जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे, महेश नलवडे उपस्थित होते.

सदर पत्रात सांगितले आहे की, शैक्षणिक वर्ष 2025-2026 16/6/2025 रोजी चालू होतं आहे. तरी आपणास विनंती आहे की आपण नियमित प्रमाणे एस.टि. सेवा सुरळीत चालू करण्यात यावी. यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांची योग्य ती सोय होईल. तरी आपणास विनंती आहे. आपण स्वतः लक्ष घालून एस.टी सेवा तात्काळ चालू करावी ही विनंती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *