करमाळा प्रतिनिधी

दिनांक १० जून ते १४ जून या कालावधीत भूटान येथे होणाऱ्या साऊथ आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत वीट गावाचे सरपंच महेश प्रभाकर गणगे भारताचे प्रतिनिधित्व करणार असून या स्पर्धेत पंच म्हणून निर्णायक भूमिका पार पाडणार आहेत. इंडियन बॉडिबिल्डर्स असोसिएशनचे महासचिव चेतन पठारे यांनी निवडीचे पत्र दिले. सरपंच महेश प्रभाकर गणगे हे

आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी या अगोदर अनेक जागतिक व आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला असून पंच म्हणून निर्णायक भूमिका पार पाडली आहे. या स्पर्धेसाठी एकूण ३८ गटात घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारात ३४ खेळाडूंची निवड भारतीय संघात झाली आहे. साऊथ आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान या देशातील खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *