करमाळा प्रतिनिधी

सत्तेच्या अगोदर संघर्ष करून पक्ष संघटना वाढवणारे नेतृत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांचं नाव अग्रक्रमाने येते ज्या ज्या नेतृत्वाने राज्यांमध्ये संघटना वाढवली त्यापैकीच एक बहुजनाचा नेतृत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडे असे मत नितीन कांबळे यांनी व्यक्त केले. ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी डॉ. श्रीराम परदेशी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, 1994-95 ला राज्यात युतीची सत्ता आली त्या कारकिर्दीमध्ये गृहमंत्री असताना गॅंगवारांचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले तसेच सरकारच्या काळामध्ये झुणका भाकर केंद्र महामार्ग ओवर ब्रिज रस्ते वीज तसेच अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या. सत्तेच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढून सत्तेच्या विरोधात रान पेटवले तसेच भाजपा उच्चवर्णी यांचा पक्ष असे संबोधले जात होते परंतु राज्यातील तमाम वंचित बहुजन घटक जोडण्याचे काम त्यांनी त्या कालखंडामध्ये केले तसेच राज्यातील मातब्बर राजकारणी घराणे भाजपामध्ये आणली त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम प्रमोद महाजन यांनी केले व त्यावेळेस मुंडे महाजन ही जोडी राज्याच्या व देशाच्या राजकारणामध्ये नवनवीन समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

यावेळी करमाळा विधानसभा संयोजक सुप्रिया नितीन कांबळे, सिद्धार्थ वाघमारे, संतोष कांबळे, बजरंग दलाचे करण अलाट, बंडू काळे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, आदि जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *