करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात गेल्या आठ दिवसां पासून होत असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी सह पाले भाज्या चे व इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करणं गरजेचं आहे

अन्यथा शेतकर्यांन पुढे आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे आपल्या पक्षाचा कृषी मंत्री असल्याने आपण या बाबतीत लक्ष घालून हेक्टरी अडीच लाख रुपये मदत देण्यात यावी यासाठी आपण महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार आसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मा. अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *