
करमाळा प्रतिनिधी
नगोर्ली ता.माढा येथे आज महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर भेट दिली. यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मामांनी शेलगांव (वांगी) ता.करमाळा येथे केळी संशोधन केंद्र होणेबाबत प्रामुख्याने मागणी करुन प्रलंबित

ड्रिपचे अनुदान त्वरित मिळावे, कांदाचाळी ज्यांच्या बांधून पूर्ण आहेत त्यांचे अनुदान, महा डिबीटी बंद आहे ते त्वरित चालू करावे, त्याचबरोबर शेतकरी यंत्र सामग्री अनुदान वाढवून मिळावे या प्रमुख मागण्या केल्या.
