करमाळा प्रतिनिधी

बारामती येथे 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यस्तरीय अक्षर संमेलन होप फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आले होते. प्राध्यापक अमित भोरकडे या कार्यक्रमाचे आयोजक होते. विशेषतः पद्मश्री अच्युत पालव सर कॅलिग्राफी तज्ञ यांचीही तिथे विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती. हा कार्यक्रम शारदानगर दिनकर सभागृह येथे आयोजित केला होता.

सर्व स्तरातून सर्व प्रकारचे कलाकार विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून चित्रकार, रांगोळी पोट्रेट, कॅलिग्राफी तज्ञ, मोडी लिपी तज्ञ, पेपर कॅलिग्राफी, स्केच तज्ञ, फेस पेंटिंग असे अनेक प्रकारची कलाकार उपस्थित होते त्या सर्वांना जवळून पाहता आले व नवीन भरपूर काही शिकता आले. सुंदर हस्ताक्षर काढत असताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाच्या काळजी व त्याबद्दल अनमोल असे मार्गदर्शनही तेथे करण्यात आले.

करमाळ्यामधून ज्योती मुथा यांची आवर्जून उपस्थिती तेथे होती त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मानही तेथे करण्यात आला. प्रचंड कलाकारांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *