
करमाळा प्रतिनिधी
आज संपूर्ण महाराष्ट्रात दहावीचा सन 2024-25 चा निकाल लागला आहे. या वर्षी नवीनच मान्यता मिळालेल्या करमाळा शहरातील नगरपालिकेच्या कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेचा निकाल पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के लागला आहे. या वर्षी दहावीच्या परिक्षेला चौदा विद्यार्थी बसले होते. त्यापैकी चौदा ही विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आहेत.

कै.नामदेवराव जगताप उर्दू शाळेतील पहिला क्रमांक मिस्बा याकुब कुरेशी 88% मार्क मिळून उत्तीर्ण झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाने सबिया सादिक शेख 85% मार्क मळून उत्तीर्ण झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर रफिया अकील शेख 77% टक्के मार्क मिळून उत्तीर्ण झाली आहे. या सर्व मुलींच्या यशाबद्दल कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जानवडकर सर, आणि शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांयांचे पालक आणि सन राईस क्लास चे प्रा. इब्राहिम मुजावर सर या सर्वांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

तसेच कुराण ए हाफीज असलेले मौलाना अब्दुल्ला शेख हे सुद्धा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल जमियत उलमा ए हिंद चे अध्यक्ष मौलाना मोहसीन, आयशा मस्जिद चे मुफ्ती अबुरेहान, जामा मस्जिद चे मौलाना अन्वर, नुरानी मस्जिद चे मौलाना मरगबुल हसन, सकल मुस्लीम समाज चे मार्गदर्शक शहर काझी हाजी कलीम काझी सर, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, अर्बन बँकेचे माजी संचालक फारुख जमादार, जेष्ठ पत्रकार नासीर कबीर, जेष्ठ पत्रकार आलिम शेख, पुढारी चे पत्रकार अशपाक सय्यद, युसुफ शेख सर, शकुर शेख सर, अमिन सय्यद सर, अॅड. नईम काझी, डॉ. सादीक बागवान, डॉक्टर समीर बागवान, अॅड. अलीम पठाण, सन राईस क्लास चे प्रा. इब्राहिम मुजावर सर, हाजी ख्वाजा हुसेन कुरेशी, जाकीर शेख, याकुब कुरेशी, बकश भाई, समीर शेख, जमीर सय्यद,रमजान बेग, सुरज शेख, जहाँगीर बेग, इकबाल शेख, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, कलीम शेख, फिरोज बेग, उद्योजक जावेद सय्यद, कलंदर शेख, यासीन सय्यद, हुमरान मुलाणी, आलीम पठाण, सोयल पठाण, आलिम शेख, चांद बेग, अरबाज बेग, शाहीद बेग, आरीफ पठाण, शकुर शेख, कयुम मदारी, ताहेर मुलाणी, जहाँगीर शेख, रमीज शेख, या तमाम मुस्लीम समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळांच्या यशस्वी विद्यार्थी व शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि करमाळा नगरपालिका चे मुख्याधिकारी सचिन तापसे, गट शिक्षणाधिकारी अनिल बनसोडे, केंद्र प्रमुख चौधरी सर यांचे अभिनंदन केले आहे.