
करमाळा प्रतिनिधी
मार्च 2025 मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल आज लागला असून कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचा निकाल 92.5 टक्के लागला आहे. या विद्यालयाचे 212 विद्यार्थ्यांपैकी 196 विद्यार्थी पास झाले आहेत.

सई लहू तनपुरे प्रथम क्रमांक 97.80%, श्रुती सतीश चव्हाण द्वितीय क्रमांक 95.60%, सक्षम सुनील वाघमारे तृतीय क्रमांक 94.00%, समृद्धी नागेश विद्वत चतुर्थ क्रमांक 93.80%, दीक्षा विलास शिंदे व साक्षी संजीत रंदवे पंचम क्रमांक 93.60% उत्तीर्ण झाल्यापैकी हे प्रथम पाच विद्यार्थी आहेत.

संस्थेचे मार्गदर्शक गुलाबराव बागल सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.