कोळगाव सब स्टेशनचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – गणेश चिवटे,

करमाळा – करमाळा तालुक्यातील कोळगाव सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाच ते सहा गावात गेल्या अनेक दिवसांपासून आठ तासावरून सहा तासावर कमी दाबाने विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते , त्यामुळे या सहा ते सात गावातील शेतकऱ्यांनी गणेश चिवटे यांची भेट घेतली व आमचा शेतीचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली होती, यावर गणेश चिवटे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली व करमाळा तालुक्यातील हा विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली,
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्याचे एस.ई माने साहेब यांच्याशी संपर्क करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती गणेश चिवटे यांनी दिली आहे,
पुढे बोलताना ते म्हणाले की कोळगाव स्टेशनवर आधारित असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही पालकमंत्री महोदयांना निवेदन दिले असता पालकमंत्री महोदयांनी सहा तासांवरून आठ तास पुर्ण दाबाने विज पुरवठा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत,
त्यामुळे येणाऱ्या काळात हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबेल असे मत गणेश चिवटे यांनी व्यक्त केले,

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *