करमाळा प्रतिनिधी

बऱ्याच वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असलेल्या ‘पोटेगाव कोल्हापूर पद्धती च्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा श्रीफळ वाढवून व बांधकाम साहित्याची पूजा करून शुभारंभ सोमवार  दि. २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वा. तालुक्याचे जेष्ठ नेते मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या व पंचक्रोशीतील मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जनतेची सेवा करणं, शासनाकडून निधी खेचून आणणं हे लोकप्रतिनीधीचे कर्तव्य असतं. देशभक्त नामदेवराव जगताप यांपासून आम्ही गोरगरिबांची सेवा केलेली आहे. उजनी धरण, मांगी तलाव, सिना-कोळेगाव प्रकल्प, कुकडी, दहिगाव उपसा सिचंन योजना, पाझर तलाव,संगोबा, पोटेगाव, तरटगाव, खडकी, मिरगव्हण आदी बंधाऱ्याची कामे झाल्याने तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. ११७ टीएमसी पाणी क्षमता असलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावरील लोड पाहता, कुकडी वा मांगीच्या तलावातील पाणी यात सोडण्याची अपेक्षा न ठेवता बंधाऱ्याच्या काम चांगले होईल याच्याकडे सर्वांनी लक्ष ठेवावे अन् पाण्याचा

वापर काटकसरीने करून ठीबक सिंचन वा तुषार सिंचनासारख्या आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी चांगली पिके पिकवून समृद्ध बनावे असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. चार पैसे मिळण्याची अपेक्षा न करता ठेकेदारानी या पोटेगाव बंधारा दुरुस्तीचे काम चांगले करावे शेतकऱ्यांची दूवा तुम्हाला मिळेल. पिढ्यानपिढ्या तुमचे नाव निघाले पाहिजे असे काम करा असे ते म्हणाले. या बंधाऱ्या मूळे पोटेगाव, बोरगाव, निलज, पोथरे, बिटरगाव श्री, बाळेवाडी, तरटगाव इ. गावातील हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. संगोबा-निलज रस्ता, तसेच कानोळा ओढ्यावरील निलजला जोडणारा पूल आपण केला. या परिसरातील जून्या व बुजूर्ग मंडळींचा नामोल्लेख करत मला राजकारणात येण्यासाठी त्यांनी मदत केली. बाबासाहेब

भोसले मुख्यमंत्री असताना पोटेगाव ला होणारे सिना-कोळगाव धरण जमीन जास्त जात होती  म्हणून धरण कोळगावला व्हावे या करीता या परिसरातील नागरिकांना घेवून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गेलो होतो असे ते बोलताना म्हणाले. स्व. नामदेवराव यांनी ‘शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे’ हे ओळखून तालुक्यात शिक्षण संस्था काढल्यामुळे गोरगरिब व सामान्य शेतकऱ्यांची मुलं शिकून मोठ्या पदावर गेले. पुढारी देशात हजा-मजा करतात अन् पुढाऱ्यांची पोरं विदेशात शिक्षणाच्या नावाखाली ऐश करतात मात्र आपण सामान्यांत मिसळून फडक्यावर चटणी-भाकरी खातो, माझे नातू जिल्हापरिषद व नगर पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. समाज माध्यमावरील श्रेयवादाच्या कमेंट करणाऱ्याबद्दल बोलताना आपण त्यांना निवडून आणलेच नसते तर… ! आपण निवडूण आणूही शकतो अन् काम व्यवस्थित नाही केले तर पाडूही शकतो असे बोलून त्यांनी विशीष्ट शैलीत त्यांचा समाचार घेतला. यावेळी पंचक्रोशीतील पोथरे-निलज गावचे सरपंच अंकुश शिंदे, पत्रकार प्रा.राजेश गायकवाड, पोटेगावचे सरपंच आजिनाथ भागडे, किरण भागडे सर, ग्रामविकास अधिकारी सुशेन ननवरे इ. नी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास ठेकेदार भारत थिटे, ज्ञानदेव गायकवाड सर, बोरगावचे माजी सरपंच किसन भोज, बिटरगावचे सरपंच दौलत वाघमोडे, मुरूमकर,शहाजी भागडे-पाटील, आदिनाथचे माजी संचालक विठ्ठल शिंदे, प्रभाकर शिंदे, खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी शिंगटे, वैजिनाथ कदम, माधवदादा नलवडे, जयद्रथ शिंदे, माजी सरपंच वंदन नलवडे, प्रमोद गायकवाड सर, चंदु भोई, श्याम भोई, दत्तात्रय नलवडे, शंकरनाना नलवडे, केशव नलवडे, गौतम मिसाळ, मारुती शेंद्रे, बबन नलवडे,नंदू नलवडे, नितीन नलवडे, शिवाजी नलवडे, अजित नलवडे,रामभाऊ गायकवाड, माजी सरपंच बंडू भागडे, पंडीत कावळे, महेंद्र जगदाळे,संतोष हराळ, रघूनाना महानवर, झुंबर कावळे,बापू शिरगीरे,सूनिल गोसावी, रहीम शेख, संदिप नाईकनवरे,सुंदरदास केसकर, अतूल देवकर,ज्ञानदेव होगले, भिमराव हाळणोर, बबन भागडे, बबन गायकवाड, दिपक अडसूळ, दत्तु अडसूळ, संतोष वाळुंजकर, नाना हाळणोर, विजय महानवर, तात्या होगले, ज्ञानदेव होगले, राजेंद्र गोडगे, किसन गायकवाड आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दत्तात्रय भागडे यांनी केले तर आभार योगेश गायकवाड यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *