करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहर ते देवीच्या माळ या रस्त्यावर दोन्ही बाजूने बेकायदेशीरपणे अनाधिकृत आपल्या टपऱ्या टाकून भाजी विक्रेते, फळेविक्रेते, चहा टपऱ्या, इतर चायनीज हॉटेल यांनी भरमसाठ अतिक्रमण करून रस्ता अरुंद केला आहे यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होतात यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेने या बेकायदेशीर टपरीधारकांना अतिक्रमण काढण्याच्या लेखी नोटीसा देऊन सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना उलटसुलट उत्तरे देऊन हे बेकायदेशीर अतिक्रमणवाले मुजोरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी शहरवासीयांच्या सुरक्षितेसाठी या बेकायदेशीर अतिक्रमण आल्यावर तात्काळगड कारवाई करावी अशी मागणी शहरवासीयातून  होत आहे याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे.

…………………….

करमाळा नगरपालिकेने भाजी फळे विक्रेत्यांसाठी स्वतंत्र भाजी मंडई बांधली असून त्या ठिकाणी फळे विक्री करण्यासाठी पत्र्याचे शेडआदी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर वाहतुकीला व सर्वसामान्य जनतेला अडथळा न आणता आपले व्यवसाय नगरपालिकेच्या अधिकृत भाजी मंडईत येथे सुरू करावेत : सचिन तपसे मुख्याधिकारी करमाळा नगरपालिका

……………………

या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासंदर्भात पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांना अधिकृत नियमानुसार नोटीसा दिले आहेत. या पुढील काळात विषयी कडक कारवाई करू. या भाजीविक्रेत्यांमुळे काही ठिकाणी गटारीवर स्लॅप टाकता आले नाहीत. त्यामुळे गटारी उघड्या राहून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याची रुंदी ही काही ठिकाणी कमी झाली आहे. शहर विकासाच्या कामाला आडकाठी आणू नये : सुनिता पाटील उपविभागीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज

…………………

अतिक्रमण टपऱ्या टाकणे व शहरातील जनतेला अडकाठी निर्माण करणे व अतिक्रमण टपऱ्याकडून पोट भाडेकरू ठेवून मूळ मालकांना ब्लॅकमेल करणे अशी एक करमाळ्यात गुंडांची टोळी निर्माण झाली आहे. या टोळीचा बंदोबस्त पोलिसांनी करावा व शहरवासीयांना न्याय द्यावा. या टपऱ्यामधून अनेक बेकायदेशीर धंदे सुद्धा चालतात : निलेश चव्हाण रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख

……………………

या रस्त्यावर सारखे छोटे-मोठे अपघात होतात. आतापर्यंत एक जनाचा जीव गेला असून 12 जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. यामुळे नगरपालिकेने या रस्त्या मधोमध रोड दुभाजक टाकावेत सार्वजनिक बांधकाम खात्याने स्पीड बेकर टाकावेत व वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत तरच शहरातील हा रस्ता मोकळा श्वास सोडेल : महेश चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *