करमाळा प्रतिनिधी

शासनाने जिं. प. प्राथ. शाळा तील संचमान्यता 2023-२४ ची आधारकार्ड वैध असणाया विद्यार्थीची ग्राहय धरली आहे. प्रत्यक्ष आधार कार्ड नसणाऱ्या विद्यार्थीचं पालक अतिशय उदासिन आहेत. मोलमजुरी करणं हातावरच पोट असल्यामुळे त्यांना काही पालकांना आधारकार्ड काढणे शक्य झाल नाही. रोजरोटी च्या स्थलांतरामुळे काही पाल्याचे जन्मदाखले नाहीत. यामुळे गामीण

भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस निघण्याची शक्यता आहे. उदा., तालुक्यातील काही शाळामध्ये 91.. विद्यार्थी मागे ४ शिक्षक मंजूर होतात परंतु आधार कार्ड असणारा विद्यार्थीची संख्या 88 किवा 89 असली तरी त्या शाळेमध्ये एक शिक्षक अतिरिक्त ठरतो यासाठी संचमान्यता आधारकार्ड न ठरविता पट संख्येवर ठरवावी अशी मागणी काही गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी समोर बोलताना व्यक्त केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *