सोलापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळा आज दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी बहुद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यलय, सोलापूर मध्ये संपन्न झाली.

या कार्यशाळेचे उद्घाटन व मार्गदर्शक डॉ. सुनील सूर्यवंशी (सदस्य गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन), महेश भंडारी (गोशाळा महासंघ जिल्हाध्यक्ष सोलापूर), ऍड. सपना वळसंगे (कायदेशीर तज्ञ), डॉ. विशाल येवले, डॉ. गिडे, श्री रामचंद्र गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, राजमाता गोशाळेचे अण्णासाहेब सुपनर तसेच या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्यातील 35 वर 70 च्या जवळपास संचालक उपस्थित होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र गोसेवा आयोग याच्या गोसेवा आयोगात नोंदणी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना परिपोषण योजना या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच पशुसंवर्ध विभागाच्या लसीकरण टॅगिंग उपचार या संदर्भ माहिती देण्यात आली.

डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी गोशाळा कागदपत्र, आवश्यक रजिस्टर, गोशाळा स्वच्छता, गोशाळा प्रचार प्रसार, गोशाळा चे विविध विभाग निधी संकलन, गोशासाठी शासनाच्या विविध योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना, गोसेवा आयोगाच्या योजना, संचालकांनी करावयाचे काम अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन याप्रसंगी केले.

याप्रसंगी या कार्यक्रमाला ऍड. सपना मॅडम यांनी गोरक्षक संस्थेंना गोशाळा कायदेविषयी मार्गदर्शन केले. गोशाळामध्ये पोलिसां द्वारे आलेले गोवंश त्याची कोर्टात केस दाखल करणे, त्याची खावटी, त्याच्या विविध कायद्याविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.  विशाल येवले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिडे यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *